
Kolhapur Crime News : ‘साउंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मीड’ या तंत्राचा वापर करून आवाज मर्यादा वाढविण्याचे प्रकार काही डीजे ऑपरेटर करीत आहेत. भाविकांच्या आरोग्याला घातक अशा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा वापरही मिरवणुकीत धूर, कागद उधळण्यासाठी होत आहे. हे प्रकार मानवी आरोग्याला अत्यंत घातक असून, असे प्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाई करून साहित्य जागेवरच जप्त करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिला.