Kolhapur Police : कोणी बनला खेळणी विक्रेता, कोणी दुकानदार; आंतरजिल्हा टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलं वेषांतर

Kolhapur Police News : संशयित कोल्हापूरकडे येत असताना आंबा घाटात त्यांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीकडून तब्बल ३२ घरफोड्या उघडकीस आणण्याची कामगिरी पथकाने बजावली.
Kolhapur Police News
Kolhapur Police Newsesakal
Updated on

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : अट्टल घरफोडे यात्रेत आकाश पाळणे उभारत असल्याची माहिती पोलिसांना (Kolhapur Police) मिळाली. संशयित साथीदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थेट समोर जाणे जिकिरीचे होते. मग, एका पोलिसाने खेळणी विक्रेत्याचा पेहराव केला, तर दुसऱ्याने दुकानदार असल्याचे भासवले. श्रीवर्धन (जि. रायगड) येथील यात्रेत सहा तास रखरखत्या उन्हात थांबून सलीम शेख, जावेद शेखची ‘कुंडली’ बनवूनच स्थानिक गुन्हे शाखेचे हे पथक परतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com