खासदार धनंजय महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गट जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्र आला आहे.
esakal
कोल्हापूर
Satej Patil Dhananjay Mahadik : मुश्रीफ -राजे गटाचं काय घेऊन बसलाय, कोल्हापुरात बंटी -मुन्ना गट आला एकत्र; 'कागल'पेक्षा शिरोळचं राजकारण तापलं
Kolhapur Politics : खासदार धनंजय महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गट जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्र आला आहे. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हेही या आघाडीत सामील झाले आहेत.
Kolhapur Politics Shirol Taluka : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राजकारणात अनपेक्षित वळण आले आहे. जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपचे गट प्रत्यक्षात एकत्र येत धक्कादायक आघाडी उभी राहिली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे गट एकत्र आल्याने खळबळ माजलेली घटना ताजी असतानाच आता खासदार धनंजय महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गट जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्र आला आहे. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हेही या आघाडीत सामील झाले आहेत.

