Kolhapur : सकारात्मक दृष्टिकोनातूनच आत्महत्या टाळता येणे शक्य

मानसोपचार तज्ज्ञांचे मत; औषधोपचार, समुपदेशनातून मात
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : वर्षभरात अगदी तरुण वयातच आत्महत्या करणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. प्रत्येक व्यक्तीची आत्महत्येची कारणे, त्या व्यक्तींची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. मात्र, आत्मविश्वास कमी होणे, एखाद्या संकट समस्येतून सुटण्यासाठी पर्यायी मार्गाची माहिती नसणे अशा अज्ञानातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते.

त्यामुळे नित्‍य जगण्यातील समस्यांवर सामाधानकारक उत्तरांचा शोध घेण्याचा सकारात्मक दृष्‍टिकोन प्रत्येक व्यक्तीत विकसित व्हावा, यासाठी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास परस्पर गैरसमजातून होणाऱ्या आत्महत्या टाळता येणे शक्य होईल, असे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

वर्षभरात जिल्ह्यात आत्महत्या व आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या गंभीर जखमींना सर्वाधिक प्रमाणात सीपीआरसह विविध शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराला आणले गेले. येथे औषधोपचार व समुपदेशन केले. यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्ती पुन्हा तंदुरूस्त आयुष्य जगत आहेत. उपचार करताना मानसोपचार तज्ज्ञांना आत्महत्येमागील कारणे व्यक्तीनुसार वेगवेगळी आढळली.

मात्र, या सर्व कारणाच्या मुळाशी आपल्यावर आलेल्या कठीण प्रसंगावर, संकट किंवा समस्येवर ठोस उत्तर मिळालेले नाही. यातून मनात वाढलेला ताणतणाव, मनाची संभ्रमीत अवस्था व त्यातून सुटण्यासाठी मार्गच नाही अशा गैरसमजातून अनेकांनी आत्महत्यांचे पाऊल उचलल्याचे दिसते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड्याच्या डॉक्टरांकडे जाणे हा गैरसमज सर्वांनी दूर करावा. मानसिक ताणतणावाची लक्षणे प्राथमिक असतानाच मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारास जावे. तेथे तणावाची कारणे शोधून ती दूर करता येणे वेळीच शक्य होते. एखाद्या व्यक्तीचा मानसिक तणाव वाढला, स्वभावात कमालीचा बदल होऊन टोकाचा राग किंवा निराशा दिसू लागली तर अशी लक्षणे कुटुंबातील व्यक्तींनी ओळखून मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यावे. तेव्हा एखाद्याच्या मनात बसलेली भीती, गैरसमज, ताण-तणाव दूर करून पुढे बिनधास्त जगणे शक्य होईल. यातून आत्महत्या रोखण्यास मदत होईल.’’

- डॉ. व्यंकटेश पवार, मानसोपचार तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com