Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

Kolhapuri Jaggery Industry Faces Growing Crisis : वाढता उत्पादन खर्च, अपेक्षित बाजारभावाचा अभाव आणि एमएसपी नसल्याने कोल्हापूरमधील पारंपरिक गुऱ्हाळघरे संकटात आहेत. गूळ उत्पादक शेतकरी साखर कारखान्यांकडे वळत असल्याने उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Kolhapuri Jaggery Crisis

Kolhapuri Jaggery Crisis

esakal

Updated on: 

प्रयागचिखली (जि. कोल्हापूर) : गावाची आर्थिक वाहिनी व पारंपरिक व्यवसाय मानली जाणारी गुऱ्हाळघरे सध्या गंभीर समस्यांच्या गर्तेत सापडली (Kolhapur jaggery industry) आहेत. कोल्हापुरी गूळ हा जगप्रसिद्ध ब्रँड झाला असला, तरी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नसल्याने व वाढत्या उत्पादन खर्चामुळे गूळ उत्पादक शेतकरी आता साखरेकडे वळत आहेत. प्रत्येक ‘आदणास’ मालकाला सुमारे २,००० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या उद्योगाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून तातडीने लक्ष न दिल्यास, येणाऱ्या पिढीला ‘इथे एकेकाळी गुऱ्हाळघरे होती’, असे सांगण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com