कोल्हापूर: इंधनाच्या बचतीतून नफ्याचे टेक्निक, आधुनिक यंत्राची निर्मिती

श्रीनिवास बारटक्के यांच्याकडून आधुनिक यंत्राची निर्मिती
petrol
petrolsakal

कोल्हापूर : इंधनाचे दर गगनाला भिडल्याने इंधनाचा काटकसरीने वापर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोल्हापूर जिल्हा हा डोंगराळ असल्याने औद्योगिक व शेतीच्या कामासाठी डंपर, बुलडोझर व जेसीबी अशा बोजड यंत्रणेचा वापर करावा लागतो. त्यासाठी इंधन मोठ्या प्रमाणात लागते. या यंत्रासाठी लागणाऱ्या इंधनाच्या बचतीसाठी साळोखेनगर येथील श्रीनिवास बारटक्के यांनी पंप कॅलिब्रेशन मशिनसाठी कंट्रोलिंग हार्डवेअर युनिट बनविले आहे. इंधनाची बचत होण्यासोबतच नफा वाढविण्याचा मार्ग अनेक उद्योजकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचा विश्‍वास बारटक्के यांनी व्यक्त केला.

petrol
'गोडसाखर'वरील सोमय्यांचे आरोप पोरकट, बेताल'

हे एक प्रातिनिधिक उदाहरण; मात्र बदलत्या काळात विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरणाऱ्या विविध तंत्रज्ञानाची निर्मिती करत ‘ॲस्ट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने हार्डवेअर उत्पादने व सॉफ्टवेअर विकसित करणारे स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे. गेल्या वर्षीच त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले असून, श्रीनिवास यांनी केआयटी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनतून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरूवात केली.

सॉफ्टवेअरही विकसित कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सॅनिटायझरचा वापर वाढू लागला. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क न येता सॅनिटायझर उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी सेन्सर असलेल्या हॅण्ड सॅनिटायझर मशिन्ससारख्या आधुनिक यंत्राची निर्मिती केली. कोरोनानंतर प्रत्येक क्षेत्रात काही मूलभूत बदल झाले. तंत्रज्ञानातही मर्यादा आल्या. या मर्यादा दूर करण्यासोबतच प्रक्रिया सोपी करत हार्डवेअर प्रॉडक्ट निर्मितीसोबत सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या श्रीनिवास यांचे स्टार्टअप औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरत आहे.

औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम व्यवसायासह विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर होतो आहे. या क्षेत्रातील समस्या अचूकपणे सोडविण्यासाठी हार्डवेअर प्रॉडक्टसोबत सॉफ्टवेअर विकसित करून देतो. यामध्ये डिस्प्ले मशीन, पंप कॅलिब्रेशन मशीन व होम ॲटोमेशन असे प्रॉडक्ट व सॉफ्टवेअर विकसित केले आहेत. - श्रीनिवास बारटक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com