Pune Bengaluru Highway Accident
esakal
उजळाईवाडी (जि. कोल्हापूर) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या तेजश्री कृष्णा यादव (वय २७, श्रीपालवाडी, ता. चंदगड) यांचा मृत्यू (Kaneriwadi container truck accident) झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.