

कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवास होणार तब्बल १ तास कमी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
esakal
Pune Miraj Railway Route : पुणे ते मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोल्हापूर ते पुणे रेल्वेचा प्रवास एक तासाने कमी होण्याची शक्यता वाढली आहे. पुणे ते मिरज मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असल्याने, छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते कठिहार, कोल्हापूर ते वैष्णवदैवी, कोल्हापूर ते जयपूर या प्रलंबित गाड्या सुरू व्हाव्यात, या मागणीने जोर धरला आहे.