Kolhapur Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांना बेदम मारहाण; मुलाने डोक्यात घातला लोखंडी बार
Kolhapur Crime Case : धामोडमध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईला शिवीगाळ केली आणि वडिलांवर लोखंडी बारने हल्ला केला. राधानगरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथील तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने (Radhanagari Father Assault Case) आईला शिवीगाळ केली. तसेच वडील सुनील भिकाजी पाटील (वय ५७) यांच्या डोक्यात लोखंडी बार घालून जखमी केले.