esakal | कोल्हापूरचा पाऊस; राधानगरी धरण क्षेत्रांत धुवांधार, सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचा पाऊस; राधानगरी धरण क्षेत्रांत धुवांधार, सतर्कतेचा इशारा

कोल्हापूरचा पाऊस; राधानगरी धरण क्षेत्रांत धुवांधार, सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
राजू पाटील

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्याला (radhanagari dam) पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत राधानगरी धरण क्षेत्रांत 194 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरण 66 टक्के भरले आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असल्याने कोल्हापूर- राधानगरी (kolhapur district) राज्य मार्गासह अन्य मार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. भोगावती नदीला पूर आला असून सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (kolhpaur rain update) महापूराकडे नदीचा प्रवास सूरू झाला असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या मार्गावरील पाण्याची माहिती घेवून प्रवास करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Kolhapur Rain Update - रामानंदनगरातील ओढ्याचे पाणी 70 घरांत

अनेक ठिकाणी ओढे-नाले वाहून गेल्याने पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. या पाण्यामुळे प्रवासी अनेक ठिकाणी दिसून आले. कुरूकली, भोगावती, येळवडे येथे पाणी रस्त्यावरून वाहत होते. रात्रभर पावसाचा जोर वाढला असल्याने अपाणी आलेल्या मार्गावरून प्रवास करू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ढगफुटी सदृश्य मुसळधार सुरू असल्याने शेतशिवारातील बांध फुटून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळीही झपाट्याने वाढत असून १४०० क्यूसेक पाणी विजगृहातून नदीपात्रात सोडले आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे.

काल बुधवारी संध्याकाळी सात वाजता फोंडघाट मार्गावर दाजीपूर जवळ पठाण पूल येथे झाड कोसळून तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती. रात्री १२ वाजता प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, वाहानधारकांनी प्रयत्नांनी हे झाड दूर करून वाहतूक सुरु केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गगनबावडा मार्ग बंद असल्यामुळे फोंडघाट मार्गे वाहतूक सुरु असल्याने रस्त्यावर गर्दी झाली होती. हा रस्ता जंगलातून जात असल्याने पाऊस, धुके व वाऱ्यामुळे सतत छोटे मोठे अपघात आणि झाडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी वाहनधारकांनी या मार्गावरून रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा अशा सुचना तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

loading image