esakal | Kolhapur Rain Update - रामानंदनगरातील ओढ्याचे पाणी 70 घरांत
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Rain Update - रामानंदनगरातील ओढ्याचे पाणी 70 घरांत

Kolhapur Rain Update - रामानंदनगरातील ओढ्याचे पाणी 70 घरांत

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे रामानंदनगर ओढ्यालगतच्या सुमारे सत्तरहून अधिक घरांत आज सकाळी पुराचे (kolhapur flood) पाणी शिरले. (Kolhapur Rain Update) ज्येष्ठ नागरिक, प्रापंचिक साहित्य व अंगणातील कुंड्या, पिंप यांची आवराआवर करताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान शेती फार्म येथील महापालिका प्रशासन कधी पडणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. (kolhapur city)

रामानंदनगर ओढ्यालगतच्या परिसरातील घरांत वर्षानुवर्षे पुराचे पाणी शिरते. भलेही ओढ्या लगतच्या दोन्ही बाजूस भिंत उभारण्यात आली असली तरी दरवर्षी पुराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काल रात्रभर झालेल्या (heavy rain) पावसामुळे आज सकाळीच घरात पाणी शिरल्याने नागरिक सैरभैर झाले. त्यांनी तत्काळ घरातील प्रापंचिक साहित्याची आवराआवर केली. परिसरातील तरुण त्यांच्या मदतीला धावून गेले. पावसाची संतत धार कमी होत नसल्याने बहुतांश कुटुंबांनी नातलगांच्या घरी जाणे पसंत केले. काहींनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या इमारतीचा आधार घेतला. (kolhapur rain breaking)

हेही वाचा: Kolhapur Rain Update - NDRF ची 2 पथके कोल्हापूरसाठी रवाना

दरम्यान सुर्वेनगर भागात ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले असून श्रीकृष्ण नगर, जनाई दत्त नगर कॉलनीतील घरांत पाणी शिरले आहे. शहरात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले असून सखल भागातील कॉलनीत घराच्या कंपाऊंडमध्ये पाणी शिरले आहे. देवकर पानंद येथील चौकात पाणी साचले आहे. नागरिक या पाण्यातून वाट काढत वाहतूक करत आहेत. येथील शाहूपुरी कुंभार गल्लीत पुराचे पाणी आले आहे.

loading image