

Kolhapur Dam Water Level
esakal
कोल्हापूर: जिल्ह्यात तीन दिवसांपासून दमदार असणाऱ्या पावसाचा जोर आज ओसरला. धरणक्षेत्रातही फारसा पाऊस झाला नाही. मात्र, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, राधानगरी धरणात सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. या तुलनेत दूधगंगा धरणातील पाणीसाठा संथ गतीने वाढत असून, सध्या ४३.३० टक्के पाणीसाठा आहे.