esakal | Kolhapur Rain Update - NDRF ची 2 पथके कोल्हापूरसाठी रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Rain Update - NDRF ची 2 पथके कोल्हापूरसाठी रवाना

Kolhapur Rain Update - NDRF ची 2 पथके कोल्हापूरसाठी रवाना

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : रात्रभर झालेल्या मुसळधार (heavy rain) पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कोल्हापूर- गगनबावडा (kolhapur rain udpate) रस्त्यावर मांडुकलीजवळ पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. (kolhapur district) धरण क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार (heavy rain) पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन एन.डी.आर.एफला (NDRF) पाचारण करण्यात आले आहे. ही दोन्ही पथके पुण्याहून कोल्हापूरला रवाना झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीचे पाणी पुलावर आल्याने बर्की (barki) गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. कोकणात जाणार फोंडा घाटात रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक थांबली आहे. दरम्यान दुसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले. आज सकाळी नदीची पाणीपातळी 36 फुटांवर गेली आहे. नदीची इशारा पातळी ३९ फुट असून ४३ फुट धोक्याची पातळी आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण ७७ बंधापे पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास पंचगंगा नदीची (panchaganga rivr) पाणी पातळी काही तासांत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

loading image