Kolhapur emotional family tragedy
esakal
कोल्हापूर : मुलीच्या हळद काढण्याच्या कार्यक्रमाची घरात तयारी सुरू होती. अचानक वडिलांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी थेट जवळच असलेल्या रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या (Kolhapur Rankala Lake case) केली. कष्टातून संसार फुलवलेल्या अरुण दिनकर गवळी (वय ५६, रा. हराळे गल्ली, शिवाजी पेठ) यांच्या या टोकाच्या निर्णयाने मात्र सारा परिसर गहिवरून गेला.