Kolhapur Ring Road firing latest updates
esakal
कोल्हापूर : दुपारी तीनची वेळ...जेवण करून आम्ही विश्रांती घेत होतो... टायर फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने रस्त्यावर धावलो... डोळ्यांदेखत गोळीबार सुरू होता...जखमी तरुणही रस्त्यावरील दगड हल्ला करणाऱ्यांवर फेकत होता....झटापटीत तो एका झुडपात पडला...उठून एका मोटारीत बसून निघून गेला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास भररस्त्यात हा प्रकार डोळ्यांदेखत पाहून आमची बोबडीच वळली होती. हा थरार घटनेचा प्रत्यक्षदर्शी स्वप्नील पोलिसांना सांगत (Kolhapur Ring Road shootout) होता.