esakal
कोल्हापूर : उचगावमधील कारखान्यातील ड्युटी संपवून गिरगावकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला मोटारीने धडक (Kolhapur Road Accident) दिली. यामध्ये दुचाकीवरील गोरक्षनाथ प्रकाश पाटील (वय ३०, रा. गिरगाव, ता. करवीर) जागीच ठार झाला, तर दुचाकीवर बसलेला त्याचा मित्र अभिजित खोत (रा. कासारवाडी) गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.