शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी चौथी फेरी पूर्ण होऊन आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यावर्षी राज्यातील शाळांमध्ये एक लाख नऊ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी तीन लाख पाच हजार १५१ अर्ज दाखल झाले. या प्रवेशासाठी सोडतीद्वारे एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांची निवड झाली.
शिरोली पुलाची : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यावर्षी राज्यातील ८ हजार ८६३ खासगी शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ रिक्त जागांसाठी ३ लाख ५ हजार १५१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले.