

Kolhapur Sangli Road Accident
esakal
Kolhapur Accident : भरधाव मोटारीने टेंपो (छोटा हत्ती) ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटार तीनवेळा उलटली. या अपघातात मोटारीमधील २२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दिव्या कानिफनाथ भोसले (सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर. मूळ रा. नानज, सोलापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर देविका भुते ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.