कोल्हापूर-सांगली रस्ता सहा महिन्यांत

केंद्रीय मंत्री गडकरी; खासदार धैर्यशील माने यांनी घेतली कऱ्हाडमध्ये भेट
kolhapur
kolhapursakal

जयसिंगपूर : रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगलीपर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे हस्तांतरण करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली. या वेळी खासदार माने यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ हा रस्ता नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे हस्तांतरित करून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. कऱ्हाड येथील लोकार्पण आणि विविध रस्ते कामाचा कोनशिला अनावरण कार्यक्रमात मंत्री गडकरी यांच्याशी खासदार माने यांनी चर्चा केली.

पुढील सहा महिन्यांत रस्त्याचा डीपीआर तयार करून घेऊन नवीन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी जाहीर केले. पूर्वी सांगली-कोल्हापूर या बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर बनविलेल्या रस्त्यावर यापूर्वी खर्च केलेली सर्व रक्कम राज्य शासन देणार आहे. हा रस्ता नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे वर्ग झाल्यामुळे रस्ता पूर्णत्वाकडे जाणार असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या प्रश्नावर मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. पुढील सहा महिन्यांत हा प्रश्न मिटेल व त्याचे भूमिपूजनही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- धैर्यशील माने, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com