Sant Balumama Temple Land Scam Case
esakal
कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात एजंट व अतिग्रेचा माजी सरपंच सागर सर्जेराव पाटील (वय ४०, रा. अतिग्रे ता. हातकणंगले) याला विशेष तपास पथकाने अटक केली. काल त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी (Sagar Patil arrested in Sant Balumama temple land case) सुनावली. त्याच्या नावे असलेल्या वटमुखत्याराची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सुवर्णा पत्की यांनी दिली.