Kolhapur: कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला? सतेज पाटलांना धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Congress

Kolhapur: कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला? सतेज पाटलांना धक्का

मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गोंधळ सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदरीवरून मोठा गोंधळ झाला होता. नागपूर येथील पदवीधर निवडणूकीतही असाच गोंधळ झाला आहे.

यातच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अल्टीमेटम दिलं आहे. यामुळे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच काँग्रेसच्या बड्या नेत्याने राम राम केला आहे.

हेही वाचा: मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूकीत बदल; MPSC कडून विद्यार्थांसाठी Alert

काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे.

माजी मंत्री सतेज पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून उमेश आपटे यांना ओळखल जातं. आपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र अजून कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. अपटे यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधान आलं आहे. तर सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे.

हेही वाचा: Pune By-Elections: चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? अजित पवारांची भूमिका महत्वाची

पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यांनी कौटुंबिक कारण दिलंय शिवाय पक्षात काम करत असताना डावलं जातं, तसेच काम करत असताना अडचणी येत असल्याचं उमेश आपटे यांचं मत आहे. तर आपटे यांच्या नाराजीवर पक्ष श्रेष्ठी मनधरणी करणार की नाही हे पाहवं लागणार आहे.