

Pregnant women waiting for sonography services at municipal hospital amid service shutdown.
sakal
कोल्हापूर : गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची असलेली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सोनोग्राफीची सेवा केवळ एक टायपिस्ट दिलेला नसल्याने बंद आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या फेऱ्या होत असून आर्थिक भुर्दंडही बसत आहे. याबाबत वारंवार चर्चा होऊनही तोडगा निघत नसल्याने मशिनरी काय कामाच्या, असा सवाल शहरवासीयांतून केला जात आहे.