
राज्य सरकारला हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घ्यायला लागला तर दुसरीकडे मराठीसाठी राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले ठाकरे बंधू एकत्र आले. शाळांमध्ये त्रिभाषा शिकवण्यावरून राज्यात वादंग उठले असताना कोल्हापूरात मात्र एका शाळेत जर्मन, रशियन, जापनीज अशा सात भाषा शिकवल्या जातात. पहिलीपासून बाराखडीचे धडे गिरवणार्या विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे भाषा शिकायला मिळत असल्यामुळे ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांची अडचण.