
कोल्हापूर : जिल्ह्यातील दुग्ध, मत्स्य, कुक्कुट, शेळी-मेंढी पालन संस्था अशा वर्षात १४८ सहकारी संस्थांची वाढ झाली. करवीर, कागल खालोखाल राधानगरी तालुक्यात ही संख्या आहे. २०२५ मध्ये ६३२९ संस्था सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे नोंद आहेत. जिल्ह्यात २.३६ टक्के सहकारी संस्थांची वाढ झाली आहे. या ना त्या कारणामुळे जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ८० सहकारी संस्थांची घट झाली आहे.