
कोल्हापुरातील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली.
esakal
Kolhapur Police Raid Apartment : महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर छापा टाकून एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने ही कारवाई उचगाव (ता. करवीर) पैकी मणेर मळा येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी सायंकाळी केली. यावेळी एका महिलेसह सुमित नेमिनाथ देशमाने (वय २९, रा. कबनूर इचलकरंजी), लखन मोहन कांबळे (३६), तौफिक ताजुद्दीन सुतार (३६, दोघे रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.