Kolhapur Shahu Mill ... अन्यथा जनरेट्याशिवाय पर्याय नाही; खासदार शाहू महाराज, छत्रपती शाहू मिल सरकारनेच चालवावी
Demand Government Control : कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा देत, मिल खासगीकरणाला विरोध केला असून ती सरकारनेच चालवावी.
कोल्हापूर : ‘छत्रपती शाहू मिल लवकर सुरू करून ती सरकारनेच चालवावी, ती कोणत्याही खासगी व्यक्तीकडे देऊ नये. तसेच मिलच्या जागेवर स्मारक उभारावे, यासाठी स्थानिक पातळीवर वातावरण निर्मिती करुया.