
Kolhapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी वाद झाल्यानंतर चिडलेल्या कृष्णा शिवाजी झेंडे (वय ४७, रा. सावे, ता. शाहूवाडी) याने मुलाला घराबाहेर काढून पत्नी सुरेखावर धारदार पारळीने प्राणघातक हल्ला केला. डोक्यात व पोटावर वर्मी घाव लागल्याने सुरेखा गंभीर जखमी झाली. दरम्यान, जखमी झालेली पत्नी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून कृष्णाने त्याच पारळीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पत्नी सुरेखाची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर सध्या कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.