Kolhapur Crime News
esakal
कोल्हापूर : गुन्हे केल्यानंतर ओळख लपविण्यासाठी अट्टल चोरटा विजय गुरव निर्जनस्थळी लपायचा. शाहूवाडी तालुक्यातील गोलिवणे वसाहतीजवळ जाऊन त्याने कंक दांपत्याकडे जेवणाची (Kolhapur Crime News) मागणी केली. जेवण देण्यास नकार दिल्याने त्याने निनू कंक व रखूबाई कंक यांना संपवल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. संशयित विजय गुरव पाच दिवस पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.