1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
esakal
1200-Year-Old Ganesh Idol Found in Aalas : शिरोळ तालुक्यातील आलास गावात सुमारे १२०० वर्षे जुनी चालुक्यकालीन गणेशमूर्ती आणि नंदी आढळून आले आहेत. सुमारे १८०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलासमधील मगदूम गल्ली परिसरात हा प्राचीन ठेवा आढळला. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील तरुणांनी या मूर्तीची स्वच्छता करून विधिवत पूजा आणि आरती केली. त्यामुळे आजवर दुर्लक्षित असलेला हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.