Shivaji University Kolhapur : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शहराचे 'हरित फुप्फुस'; जैवविविधतेचा 853 एकरांमध्ये अनमोल ठेवा, 13 हजारांहून अधिक वृक्ष, 126 पक्षीप्रजाती

Shivaji University Kolhapur biodiversity conservation : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा ८५३ एकरांचा परिसर १३ हजारांहून अधिक वृक्ष, १२६ पक्षी आणि सुमारे ६४ फुलपाखरांच्या प्रजातींमुळे जैवविविधता संवर्धनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरत आहे.
Shivaji University campus 13000 trees

Shivaji University campus 13000 trees

esakal

Updated on: 

कोल्हापूर : उच्च शिक्षणाचे केंद्र असलेले शिवाजी विद्यापीठ जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय समतोलाचेही महत्त्वपूर्ण उदाहरण ठरत (Shivaji University campus 13000 trees) आहे. तब्बल ८५३ एकरांवर विस्तारलेल्या विद्यापीठाच्या परिसरात १३ हजारांहून अधिक वृक्ष, पक्ष्यांच्या १२६ प्रजाती, फुलपाखरांच्या सुमारे ६४ प्रजाती आणि विविध प्रकारच्या वनस्पती व वन्यजीवांचा अधिवास आहे. पश्चिम घाटाच्या जैविक समृद्धीशी नाते सांगणारा हा परिसर कोल्हापूर शहरासाठी नैसर्गिक हरित फुप्फुस म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com