Shivaji University Convocation : शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या तनुजाचे पुढचे ध्येय वाचून तुम्हीही कराल कौतुक; वेदिकानही केलं वडिलांचं स्वप्न पूर्ण

Shivaji University Gold Medal Winners 2026 : शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात मुलींनी सुवर्णपदकांवर बाजी मारली. तनुजा साळोखेला राष्ट्रपती, तर वेदिका कदमला मानसशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कुलपती सुवर्णपदक मिळाले.
Shivaji University Girls Academic Achievement

Shivaji University Girls Academic Achievement

esakal

Updated on: 

कोल्हापूर : उच्च शिक्षणासह रोजगाराच्या संधी मिळवून देण्यातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या पदवीबरोबरच शिवाजी विद्यापीठातील सन्मानाची राष्ट्रपती आणि कुलपती सुवर्णपदक मिळविण्यात यंदा मुलींनी बाजी मारली (Shivaji University Convocation Ceremony 2026) आहे. यंदाच्या दीक्षान्‍त समारंभात पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविद्या आणि आंतरविद्याशाखा या चार विद्याशाखांच्या मिळून एकूण ६०,२५० स्नातकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. यात विद्यार्थिनींची संख्या ३४,६७०, तर विद्यार्थ्यांची संख्या २५,५८० आहे. विद्यापीठ प्रांगणात २० हजार ५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली असून उर्वरित ४० हजार १९७ जण पोस्टाने पदवी घेणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Shivaji University Gold Medal Winners
Shivaji University SUTA Election
Asian Para Games 2026
Shivaji University campus 13000 trees