Shivaji University SUTA Election
esakal
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) मध्यवर्तीच्या द्वैवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०२८) विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र कृष्णा तथा आर. के. चव्हाण यांच्या सत्तारूढ गटाने संघर्ष समितीला धक्का देत बाजी (SUTA election results 2026-2028 Kolhapur) मारली. दोन वर्षांत सत्तारूढ गट आणि संघर्ष समितीत आरोप-प्रत्यारोप, पत्रकबाजी रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे प्राध्यापकांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत सत्तारूढ गटाला प्रा. निवास वरेकर आणि काही निवृत्त पदाधिकाऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून आव्हान दिले.