

Kolhapur Shocker Divisional Forest Officer Suffers heart Attack
esakal
Officer heart attack on duty : व्हन्नूर (ता. कागल) येथील इंद्रजित वसंतराव निकम (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथे विभागीय वन अधिकारी म्हणून ते सेवेत कार्यरत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कागलचे माजी आमदार दौलतराव निकम यांचे ते नातू होत. कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयात बी.एस्सी.(अॕग्री) झाल्यानंतर त्यांनी राहुरी येथे एम.एस्सी.(अॕग्री)चे शिक्षण घेतले. त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत रेंज फॉरेस्ट ऑफिसरपदी त्यांची १२ वर्षांपूर्वी निवड झाली होती.