

Kolhapur Farmer Accident fire death
esakal
farmer death burning leaves Kolhapur : पालापाचोळा जाळण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्याच्या पायाला ठेच लागून आगीच्या लोळात सापडल्याने गंभीर भाजून त्यांचा मृत्यू झाला. शंकर बापू चव्हाण (वय ७०, रा. चव्हाणवाडी, ता. आजरा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘वडाचे नाव’ या शेतात घडली.