

esakal
Kolhapur Police : गगनबावडा मार्गावरील शिंगणापूर फाट्यावर दुचाकी बाजूस घेण्यास सांगितल्याच्या रागातून आरबाज फयाज बागवान (वय २७, सध्या रा. फुलेवाडी, मूळ रा. लक्षतीर्थ वसाहत) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भररस्त्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी अक्षय आनंद ओतारी (वय २६, रा. चंबुखडी परिसर) याला करवीर पोलिसांनी अटक केली. या हल्ल्यामागे दोघांतील जुन्या वादाची किनार असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान, अक्षय ओतारी याला झालेल्या मारहाणीबद्दल आरबाज बागवान याच्यावरही गुन्हा दाखल झाला.