

कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पती-पत्नीचा खून करणारा आरोपी ‘सीरियल किलर’ निघाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
esakal
Kolhapur Killing Tragedy : मोटारसायकल चोरी, घरफोडी करून स्वतःचे अस्तित्व लपविण्यास जिल्ह्यातील डोंगराळ भाग शोधायचे, वृद्ध दांपत्याला दमदाटी करून घरी आसरा मिळवायचा... पुन्हा सक्रिय होऊन चोऱ्या, घरफोड्या करायच्या... पोलिसांची डोकेदुखी बनलेला विजय गुरव हा ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पोलिसांना ‘चकवा’ देऊन निसटला. यानंतर त्याने रत्नागिरीत एका वृद्धेचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहेत. त्यापाठोपाठ शाहूवाडीत पोहोचून वृद्ध कंक दांपत्याला संपवत ‘सीरियल किलर’ ठरला आहे.