Kolhapur electoral roll revision 2026
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत आजअखेर ९९.९१ टक्के काम पूर्ण झाले (Kolhapur voter list) आहे. यामध्ये २९ लाख १९३२ मतदारांची पडताळणी (डिजिटलायझेशन) पूर्ण झाले असून, चार लाख ५० हजार ३०२ मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये मृत, दुबार, अनुपस्थित, कायम स्थलांतरितांचा समावेश आहे. यातील अनुपस्थितांना सोमवारी (ता. १७) मोहिमेच्या अखेरच्या दिवशी अर्ज देता येणार आहे.