

Social Media Friendship Turns Shocking in Kolhapur
esakal
Social Media Crime Case : सोशल मीडियावर मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हातकणंगले शहरातील चौदा वर्षीय अल्पवयीन युवती थेट रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील आपल्या मित्राकडे जायला निघाली. या घटनेने हातकणंगले शहरात आज चांगलीच खळबळ उडाली. पोटाची खळगी भरण्यासाठी येथे आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन युवती शहरातीलच एका शाळेमध्ये शिक्षण घेते.