

Kolhapur–Solapur highway accident news
esakal
Kolhapur–Solapur Road Accident Death : निवास चौगले : कोल्हापूर–सोलापूर महामार्गावर शिरढोणजवळ भरधाव कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास घडली. संतोष धोंडिराम गायकवाड (वय ४५) आणि त्यांची पत्नी ॲड. वंदना संतोष गायकवाड (वय ३८, रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) अशी मृतांची नावे आहेत.