esakal | कोल्हापूर स्पोर्ट्सचा तारा निखळला; सरदार मोमीन यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

सरदार मोमीन

कोल्हापूर स्पोर्ट्सचा तारा निखळला; सरदार मोमीन यांचे निधन

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर: कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सरदार मोमीन यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच कोल्हापुरात लॉंग टेनिस रुजवण्यात ही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य लॉंग टेनिस असोसिएशनमध्ये त्यांनी तब्बल ४० वर्षे काम केले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे अत्यंत विश्वासू होते. पन्नास वर्षे या संस्थेसाठी कष्ट घेतले. खासदार युवराज संभाजीराजे आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केएसएचे काम सांभाळले. क्रिकेट खेळाडू म्हणून क्रीडाक्षेत्रात कॉलेजवयीन काळात सुरुवात केली. केएसएसाठीची पन्नास वर्षे, महाराष्ट्र राज्य लॉंग टेनिस असोसिएशनसाठीची ४० वर्षे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि सद्यपरिस्थितीत कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन अशा विविध नामवंत संस्थांसाठी काम केले.

हेही वाचा: राज्यभरातून 3 लाखांवर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल

कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. स्वतः फुटबॉल खेळाडू नसून देखील त्यांनी कोल्हापूरच्या फुटबॉलला जिवंत ठेवण्यासाठी रणांगणातील सरदाराप्रमाणे कामगिरी केली. फुटबॉल या खेळात वादविवाद, मतमतांतरे निर्माण झाल्यानंतर थंड डोक्याने यावर तोडगा काढून आपण सरदार असल्याची प्रचिती त्यांनी वेळोवेळी दिली.

loading image
go to top