esakal | ...अखेर‘ लालपरी’धावली ; कसे असणार कोल्हापूर आगाराचे वेळापत्रक? 
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur st bus stand time table

शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत आहे.

...अखेर‘ लालपरी’धावली ; कसे असणार कोल्हापूर आगाराचे वेळापत्रक? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तब्बल पाच महिन्याच्या ब्रेकनंतर आज लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी धावली. आंतरजिल्हा बससेवा आजपासून (ता.२०) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल दिली होती. त्यांच्या आदेशानुसार आज राज्यभर बस सेवा सुरू झाली.  

याबाबत माहिती देताला परब म्हणाले, ‘‘एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत आहे. त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्यांचे आगाऊ आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. एसटीच्या प्रवासासाठी इ पासची आवश्यकता नाही. मात्र प्रवासात प्रवाशांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.’’आजपासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा  कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 
‘‘प्रवाशांच्या गरजेनुसार बस सोडण्यात येतील. ऐन वेळी एखाद्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली तर त्या प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाड्या तातडीने सोडल्या जातील. त्यासाठी प्रत्येक बसस्थानकातील अधिकारी नियोजन करतील. याशिवाय ज्या प्रवाशांना आपला गट करून पूर्व नियोजीत प्रवास करायचा आहे. अशांची पुरेशी संख्या असल्यास त्यांच्यासाठी ही बससेवा पुरवली जाईल.’’
-रोहन पलंगे, एसटी विभाग नियंत्रक कोल्हापूर


काही आगार व गाड्यांचे वेळापत्रक 
आगार       फेरीचा मार्ग    फेरी सुटण्याची वेळ
कोल्हापूर    कोल्हापूर - सांगली    प्रत्येक तासाला 
 कोल्हापूर - इस्लामपूर     प्रत्येक तासाला 
संभाजीनगर    संभाजीनगर ते पूणे    सकाळी १० वाजता. 
इचलकरंजी    इचलकरंजी ते सांगली    प्रत्येक तासाला. 
 इचलकरंजी ते मिरज    प्रत्येक तासाला 
 इचलकरंजी ते सोलापूर    सकाळी ८. ३० 
गडहिंग्लज    गडहिंग्लज ते पुणे    सकाळी १०
गारगोटी    गारगोटी ते पुणे    सकाळी ८. ३०
मलकापूर    मलकापूर ते पुणे    सकाळी ९
 कोल्हापूर ते रत्नागीरी    सकाळी ११.३०
चंदगड    चंदगड ते निगडी    सकाळी १०
कुरूंदवाड    कुरूंदवाड पुणे स्टेशन    सकाळी ८
कागल    कागल कागल ते सातारा    दुपारी १२

हे पण वाचाअन् राजू शेट्टींचा मुलगा धावला बहिणीच्या मदतीला

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top