
Mahadevi Elephant : ‘महादेवी हत्तीण’ परत मिळविण्यासाठी आज कोल्हापूर जिह्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून नांदणी येथून निघालेली पदयात्रा कोल्हापूर शहराच्या दारात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विश्वजित कदम, आमदार राहुल आवाडे, बेळगावचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, भाजपचे सावकार मादनाईक व अन्य पक्षाचे प्रतिनिधी यांनीही पदयात्रेत सहभाग घेतला आहे. दिवसभरात ४५ किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.