

Sugar Mills Face Financial Crisis
sakal
कोल्हापूर : साखरेच्या हमीभावात न झालेली वाढ आणि दुसरीकडे साखर उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे साखर कारखान्यांसमोर अार्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे महिन्याची साखर विकून तुटलेल्या उसाचे १५ दिवसांचे बिल देण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे. अशीच स्थिती राहिल्यास शेवटच्या टप्प्यात तुटलेल्या उसाचे बिल देताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.