Kolhapur : पैसं द्या,नायतर उस तोडणार नाय !

शेतकऱ्यांची थांबेना लूट : ऊसतोड टोळीला वैतागले, हंगामात ६५० कोटींचा मजूर व्यवसाय
ऊसतोड मजूर
ऊसतोड मजूरsakal

जिल्ह्यात उसाच्या गळीत हंगामात दीड ते दोन लाख मजुरांना रोजगार मिळतो. ऊसतोड मजूर म्हणून काम करताना ऊसतोड मजुरांच्या टोळीला प्रतिटन सरासरी ६५० ते ७०० रुपये ऊस तोडणी व वाहतुकीचे मिळतात. वर्षातील नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यात ऊसतोड मजुरांना ऊस तोडणी व वाहतुकीचे तब्बल ६०० ते ६५० कोटी रुपये मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.

इतका मोठा रोजगार ज्यांच्या जीवावर हा मिळतो, त्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले जात आहे. ऊस तोडणीसाठी प्रतिटन शंभर ते दीडशे रुपये मागून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. एकीकडे एफआरपी वाढावी म्हणून वर्षभर सरकारच्या मागे लागायचे, साखरेला प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये मिळावेत यासाठी झगडावे लागते, तर दुसरीकडे मजुरांकडून होणारी लूट कोणीही थांबवू शकत नाही.

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. चांगल्या उसामुळे उतारा आणि गोडवा यामुळे कोल्हापूरची साखर सर्वांच्याच पसंतीची आहे. वेळेत ऊसतोड होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक कारखान्याच्या गटविकास अधिकाऱ्याला हात जोडावे लागतात. तरीही पंधरा ते सोळा महिने पूर्ण झाल्याशिवाय तोड मिळत नाही.

बारा महिन्यांचे पीक असताना सोळा महिने शेतात ठेवावे लागते. त्यामुळे तीन ते चार महिन्यांचा जादा खर्च करावा लागतो. एवढं सगळं करून ऊसतोड मिळते, याचा आनंद होतो; पण ऊस तोडण्यासाठी प्रतिटन शंभर ते दीडशे रुपये दिल्याशिवाय उसाचं कांडही तोडणार नाही,

असं मजुरांकडून स्पष्ट शब्दात सांगितले जाते. ऊसतोड असताना त्यांना प्रतिटन पैसे द्यायचे, रोज नाष्टा व अखेरीस पार्टी नित्याचीच. शिवाय उसाचे वाडे (वैरण) ही तेच विकून पैसे घेतात. याशिवाय प्रतिटन तोडणी-ओढणी वाहतुकीची रक्कमही घेतात.

साखर कारखाना ऊस तोडणी व वाहतूक खर्च

तात्यासाहेब कोरे-वारणा ६५२.३८

भोगावती-परिते ५९४. ३९

छत्रपती राजाराम-कसबा बावडा ६५९.३७

छत्रतपी शाहू- कागल ७४०.१८

दत्त शेतकरी-शिरोळ ७०६.१८

दूधगंगा-वेदगंगा-बिद्री ६५१.७२

आप्पासाहेब नलवडे -हरळी ६७६.३३

सदाशिवराव मंडलिक-कागल ६८१.८५

कुंभी-कासारी, कुडित्रे ६३८.६३

रत्नाप्पाण्णा कुंभार-इचलकरंजी ७३१

शरद-नरंदे ७२३.९३

आजरा-गवसे ७७०.२७

जवाहर शेतकरी-हुपरी ७२४.३१

अथणी शुगर्स-शाहूवाडी ७४३.१७

इंदिरा-तांबाळे ८८४.७९

डॉ. डी. वाय. पाटील-गगनबावडा ७२९.५२

गुरुदत्त शुगर्स-टाकळीवाडी ७५७.३२

इको केन शुगर- म्हाळुंगे ८२८.९०

हेमरस-राजगोळी ७७६.८९

रिलायबल शुगर्स- फराळे ७४०.६१

संताजी घोरपडे- कागल ८२१.४९

दालमिया शुगर्स- आसुर्ले-पोर्ले ७८४.४७

दौलत-हलकर्णी ७०९.४९

शेतकऱ्यांनी करावा हा पर्याय

शेतकऱ्यांनी ऊस वेळेत तोडण्यासाठी दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा एक गट (टोळी) करावा. या गटातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडता येईल. त्यांच्या जनावरांना वैरण मिळेल. याशिवाय प्रतिटन ऊस तोडणी व ओढणीची रक्कमही मिळू शकेल. कोणाला हात जोडण्याऐवजी स्वत:चा गट तयार केल्यास उसाची वेळेत तोड होऊ शकते. यामुळे तोडणी-ओढणीसाठी इतर जिल्ह्यांत जाणारे ५०० ते ६०० कोटी रुपये जिल्ह्यातच राहतील.

उसाची एफआरपी वाढावी यासाठी आंदोलनं होतात. वर्षाला ५० ते १०० रुपयांपर्यंत एफआरपी वाढवतात. मात्र, ऊस तोडणी आणि ओढणीच्या रकमेसह शेतकऱ्यांना मिळणारे शंभर रुपये लुटतात. त्यामुळे सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.

-दिगंबर कदम, शेतकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com