Kolhapur Sunil Mane Death
esakal
कोल्हापूर : मित्रांसोबत पार्टीवेळी अंगावर गरम रस्सा सांडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या सुनील माने (रा. लक्ष्मीपुरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारी तीन वाजता घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळी त्यांच्या घरच्यांना (Kolhapur hot curry burn accident) दिली. ‘आम्हाला उशिरा का माहिती दिली?’ अशी विचारणा केल्याने माने यांचा भाऊ रवींद्र माने, भावजय शर्मिला माने, पुतण्या शुभेंदू यांना मृत सुनीलच्या मित्रांकडून मारहाणीचा प्रकार दसरा चौकातील रुग्णालयाबाहेर घडला होता. याप्रकरणी तिघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.