कोल्हापूर : शहराच्या विकासाचे नियोजनबद्ध डिजिटल व्हिजन आज ‘सुराज्य संकल्प’च्या माध्यमातून जनसुराज्य शक्ती, आरपीआय (आठवले गट) आणि पी.आर.पी. (कवाडे गट) यांच्यावतीने जाहीर करण्यात आले. .भुयारी मार्गातून अंबाबाई दर्शन, एआयच्या माध्यामातून ट्रॅफिक कंट्रोल, शाहू मीलच्या जागेत उद्योग क्लस्टर, अशा नियोजनबद्ध विकासाचा अजेंडा असल्याचे त्यांनी आकडेवारी, खर्चासह जाहीर केले..Dhule News : धुळ्याचा कायापालट! ७७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; शहरात साकारणार हायटेक 'जयहिंद सिटी मॉल'.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. यावेळी आमदार अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम, ॲड. राजेंद्र पाटील, माजी महापौर उदय साळोखे, आरपीआय गटाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, कवाडे गटाचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..आमदार कोरे म्हणाले, ‘समृद्धीचा विचार देणारे पूर्वीच्या कोल्हापूरचे गतवैभव परत आणायचे आहे. ज्यावेळी गटाचे आणि आघाडीचे राजकरण महापालिकेत होते, त्यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाने पक्षीय राजकरण आणले. आजच्या निवडणुकीत पक्षीय स्तरावर राजकरण सुरू झाले. .Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल.या माध्यमातून जाहीरनामे, वचननामे राजकीय पक्ष देत आहेत. हीच खरी लोकशाही आहे. त्याची सुरुवात जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापुरात केली. ती आता समृद्ध करायची आहे.वास्तवातील विकास करायचा आहे. .महापालिकेत ५३ टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर होतो आहे. इतर योजनेतून, जीएसटीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम साधारण १३०० कोटी जमा होते. त्याचा खर्च पाहता विकासाला फार कमी पैसे उरत आहेत. त्यामुळे वास्तवातील विचार करून विकास संकल्पना आम्ही मांडली आहे..आमदार कोरे म्हणाले, ‘महायुतीकडून अपेक्षित जागा मिळत नाही म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय उशिरा घेतला. त्यामुळे नाराज आमच्याकडे आहेत, असेच सर्व पक्षांकडे आहेत. चांगल्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही महत्त्वाचे ठरलो आहोत. .हद्दवाढ करून काय मिळणार आहे, असा माझा प्रश्न आहे. त्यामुळे हद्दवाढ, थेट पाईपलाईन, आयआरबी रस्ते प्रकल्पावर काही बोलणार नाही. याबाबत वस्तुस्थिती पाहून पावले उचणे आवश्यक होते. त्याला राजकीय मुद्दा केला गेला आहे. आमदार सतेज पाटील यांनी जागेचा विषय काढला. त्याचे मी उत्तर दिले. त्यानंतर आमदार पाटील यांनी तो विषय थांबविला.. सुराज्य संकल्पातील ठळक मुद्दे पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी लंडन आणि गंगा जलशुद्धीकरणाचा पॅटर्नट्रॅफिक कंट्रोलसाठी एआयचा वापरशाळेसाठी दिल्लीतील केजरीवाल यांचा पॅटर्न वापरणारअंबाबाई मंदिरात भुयारी मार्गातून दर्शन व्यवस्थारेल्वेस्थानक मार्केट यार्ड येथे हलविले जाईल.डिजिटल करप्रणाली लागू होईलरोजगार उपलब्ध केला जाईलशाहू मिल जागेत उद्योग उभा केले जातील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.