Talsande Hostel Student Assault
esakal
तळसंदे वसतिगृहातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप उसळला.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध संघटनांकडून झाली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
कोल्हापूर : तळसंदे येथील एका निवासी वसतिगृहामधील काही मोठ्या विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा जुना व्हिडिओ (Talsande Hostel Student Assault Case) आज व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. जिल्ह्यातील पालकवर्गासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या संस्था-संघटनांकडून संताप व्यक्त झाला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.