Kolhapur 10 Km Flyover Project Details
esakal
कोल्हापूर : शहरासाठी प्रस्तावित तावडे हॉटेल-फुलेवाडी रिंगरोड-गगनबावडा रस्ता अशा दहा किलोमीटरच्या उड्डाणपुलाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पंधरा दिवसांत केंद्र सरकारला दिला (Kolhapur flyover Project) जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे सांगितले. दरम्यान, १० कि.मी.च्या पुलासाठी १३ हेक्टर जमिनीचे संपादन होणार असून, सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे, असे ‘मॅप्स ग्लोबल’चे तज्ज्ञ सल्लागार पी. जी. चौगुले यांनी सांगितले.