
Kolhapur Crime News : शालेय विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याबद्दल निसारीअहमद मुल्ला या शिक्षकाला जमावाने काल चोप दिला. त्याला न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संबंधित शाळेत जाऊन आज मुरगूड पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवले. शिक्षकांचे कामकाज आणि विद्यार्थ्यांची माहिती घेतली. शाळेत घडलेल्या कालच्या घटनेमुळे आज विद्यार्थी संख्या कमी राहिली. काही पालकांनी स्वतः आपल्या मुलांना शाळेत आणून सोडले. शिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन संस्था प्रतिनिधींसमवेत पालक मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.