esakal | कोल्हापूर: 'आनंद' यांच्या यशाने दारवाडात जल्लोष; देशात ३२५ वा
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: 'आनंद' यांच्या यशाने दारवाडात जल्लोष; देशात ३२५ वा

कोल्हापूर: 'आनंद' यांच्या यशाने दारवाडात जल्लोष; देशात ३२५ वा

sakal_logo
By
अरविंद सुतार

कोनवडे (कोल्हापूर): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने यूपीएससी) २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दारवाड (ता. भुदरगड) येथील आनंद अशोक पाटील देशांमध्ये ३२५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आनंद पाटील यांच्या निवडीने दारवाड आनंदोत्सव व भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.'आनंद' यांच्या यशाने दारवाड येथे 'आनंद' असंच म्हणावे लागेल.

हेही वाचा: पुणे: विविध शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

आनंद पाटील अल्प दृष्टी असताना देखील यावर मात करून यश मिळविले. त्यांच्या या यशाने दारवाड व भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आनंद यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

तीन वर्षांपासूनच त्यांना अल्प दृष्टी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गारगोटीत तर माध्यमिक शिक्षण आंबोली येठे झाले. मौनी विद्यापिठाच्या आयसीआरई मध्ये सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा केला तर इस्लामपूर येथे २०१७ मध्ये बीटेक डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

कठोर परिश्रम घेतले व २०१८ साली त्यांनी यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली मात्र मुलाखतीमध्ये त्यास यश आले नाही. पुन्हा २०१९ मध्येही त्याना यश आले नाही. तरीदेखील अपयशाने खचून न जाता पुन्हा त्यांनी खडतर परिश्रम घेऊन जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले.

३ ऑगस्ट रोजी त्याची मुलाखत झाली. या परीक्षेचा आज निकाल लागला ते देशांमध्ये ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शुक्रवारी (२४) सायंकाळच्या सुमारास त्याचा निकाल समजताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आपण घेतलेल्या खडतर परिश्रमाला यश आले असून या निकालाने भारावून गेल्याची प्रतिक्रिया आनंद यांनी व्यक्त केली.

वडील सेवा निवृत्त शाखा अभियंता अशोक पाटील यांनी आनंदला अल्पदृष्टी असतानादेखील आनंदने रात्रंदिवस अभ्यास करून घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हे त्याला यश प्राप्त झाले असून त्याच्या या निकालाने आम्ही सर्व कुटुंब आनंदित झाल्याचे 'दै.सकाळ'शी बोलताना सांगितले. आनंद यांच्या यशाने दारवाड ह्या गावी एकच जल्लोष झाला. गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

loading image
go to top